Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची आज शेवटची तारीख, घरबसल्या असे करा अपडेट!

Aadhar Update | १४ सप्टेंबर ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख असून आधार कार्ड वरील पत्ता, नाव, जन्म तारीख, फोन नंबर या गोष्टी तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तिथे Update Aadhaar म्हणून पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
हेही वाचा – दिघी बायपास रस्त्याच्या कामाला ‘‘गती’’
तिथे तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल वर येणारा ओटीपी नंबर टाका. यानंतर तुम्हाला कागदपत्रं अपडेट करुन पडताळणी करावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करा.त्यानंतर Submit वर क्लिक करा. तुमचं आधार कार्ड विनामूल्य सात दिवसांत अपडेट केलं जाईल.





