ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जरांगे पाटीलांचा इशारा, ‘विधानसभेत अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल’

मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणार ,विधानसभा निवडणुकीचे पडघम

महाराष्ट्र : राज्यात विधानसभा निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे. गुणाकारासोबत कुठे भागाकार करता येईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेत अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल, असा इशारा दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

राज्यात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीने पण जागा वाटपाचा फॉर्म्युलचे गणित जुळवायला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणार याकडे पण सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button