ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापुरुषांचे स्थापित स्मारकांचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करा ; शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे निवेदन

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचे स्थापित पुतळ्यांचे स्मारकांचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करणे बाबत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे वतीने निवेदन देण्यात आले.
हेही वाचा – धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ कैलास भाऊ कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सामाजिक सलोखा अभियान चे प्रमुख राजन जी नायर, सामाजिक न्याय चे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल वहाब, अब्बूबकर लांडगे, शहर उपाध्यक्ष माजीद भाई शेख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.





