गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुणे : पुण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू आणि सामान जप्त करण्यात आले आहे. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.
हेही वाचा – ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोन्याचे व चांदीचे भाव काय आहेत?
विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं.
दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करत आहेत.




