Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

Pune | भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद

Share On

पुणे | खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी भिडे पूलावरून पाणी वाहून लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्परते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला आहे. भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. पाणी ओसरल्यानंतर पूल वाहतुकीस खुला करून दिला जाईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचा      –        पुणे शहरातील पूराच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर स्वच्छता व मदतकार्य

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ७ हजार ७०४ क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, असं आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button