Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १०,००० रुपये; PM Kisan मध्ये मोठ्या बदलाची लवकरच होणार घोषणा!

PM Kisan Scheme | केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. हे सरकार यंदा त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी महत्वपूर्ण घोषणा करतील. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठी लॉटरी लागण्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची चर्चा झाली आहे.

अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढविण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढविण्यात येऊ शकतो. सध्या त्यांना वार्षिक ६००० रुपये हप्ता मिळतो. तो वाढवून सरकार १०,००० रुपये करण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा      –      Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर पाणी, गुडघाभर पाण्यातून वाहनांचे मार्गक्रमण 

पीएम किसान योजनेचा हप्ता वाढला तर शेतकऱ्यांना अनेक कामासाठी ही रक्कम उपयोगी पडेल. त्यांना खते, बि-बियाणे खरेदीसाठी त्याचा वापर करता येईल.

किसान सन्मान निधीची योजनेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरतंर्गत रक्कम जमा होते. दर चार महिन्यांनी तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button