ससून रुग्णालयावर लक्षवेधी; रवींद्र धंगेकर, अनिल देशमुखांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

ससून रुग्णालयावर लक्षवेधी; रवींद्र धंगेकर, अनिल देशमुखांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. पुण्यातील शासकीय ससून रूग्णालयाच्या कारभारावरून आज (4 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुख, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दोघांनी मिळून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केली.

आमदार अनिल देशमुख यांनी वजन कमी करण्याच्या सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि त्याचबरोबर मुश्रीफ साहेब पेशंट म्हणून तिथं जाणार का? अशी विचारणा केली. यानंतर मुश्रीफ यांनी सुद्धा खोचक शब्दामध्ये प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, वजन कमी केल्याने अडचण होते. माझं वजन जास्त आहे, पण सर्जरी करून वजन कमी करण्यापेक्षा मी व्यायाम करून वजन कमी केल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे देशमुख साहेबांनी माझा फार विचार करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.

हेही वाचा    –      ‘अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर चोरला’; संजय राऊतांचा टोला 

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभारावरून वाभाडे काढले. ते म्हणाले की, मी ससून रुग्णालयामध्ये आठवड्यातून दोनदा जातो. माझा ससूनशी दररोजचा संबंध आहे. ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. मागील वेळी डॉक्टर पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? अशी विचारणार धंगेकर यांनी केली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन ससूनला भेट देऊ आणि सुधारणा करू, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *