Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेसाठी भाजपची ५ नावं जाहीर, वाचा यादी

मुंबई | राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

२०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा समान करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा    –      ..तर नरेंद्र मोदी पराभूत झाले असते; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल 

दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group