उद्धव ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार; शिंदे गटातील नेत्याचा दावा

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यातील चित्र बदललं आहे. महायुतीला निवडणुकीत मोठं अपयश आलं तर महाविकास आघाडीला यश आलं आहे. यातच शिंदे गटाने मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या या दोन नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे.
हेही वाचा – पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्क! रोहित शर्माला सराव सत्रात दुखापत
मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे.





