‘हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं’; विजय वडेट्टीवारांचं प्रकाश आंबेडकरांना खोचक प्रत्युत्तर

‘हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं’; विजय वडेट्टीवारांचं प्रकाश आंबेडकरांना खोचक प्रत्युत्तर

मुंबई | काँग्रेस सक्षण नेतृत्वहीन असल्याने त्यांच्या पक्षात निर्णय क्षमता नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आणखी जागा वाढवून देऊ, असं म्हटलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका केली होती. या टीकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही प्रकाश आंबेडकरांना पसंत केले होते. पण त्यांनी लग्नासाठी का नकार दिला. हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं, त्यासाठी चर्चा करायची होती. पण त्यांनी लग्न मोडलं.

हेही वाचा    –    आज वर्षातले पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? वाचा सविस्तर..

पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचा होईल, लोकं ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, असं ते म्हणाले.

एकनाथ खडसे भाजपात परतणार आहेत. याबाबत विचारलं असता. ते म्हणाले, गळ्याला फास लागला बिचारे काय करणार? संजय सिंगला फसवत बेजार केलं. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, पक्षबदलाची भूमिका त्यांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *