Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

Parliament Of India : संसदेची सुरक्षा नेमकी कशी असते? वाचा सविस्तर..

Share On

Parliament Of India : संसदेत हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन अज्ञात तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. संसदेत कामकाज सुरू असताना या तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? संसदेची सुरक्षा नेमकी कशा प्रकारची असते? तर चार स्तरांमध्ये संसदेची सुरक्षा असते.

राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांची स्वतःची वैयक्तिक संसद सुरक्षा सेवा आहे. पूर्वी ही सुरक्षा वॉच अ‍ॅण्ड वॉर्ड म्हणून ओळखली जात होती. या सुरक्षा सेवेचे मुख्य काम संसदेत प्रवेश करण्यास परवानगी देणे, तसेच सभापती, अध्यक्ष, उपसभापती आणि खासदारांना सुरक्षा प्रदान करणे हे होते. तसेच संसद सुरक्षा सेवा सामान्य लोक, पत्रकार, तसेच सन्माननीय किंवा संविधानिक पद असलेल्या लोकांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचेही काम करते.

हेही वाचा  –  Guinness World Record : गोष्टी सांगण्यात पुणेकर अव्वल, चीनचा विक्रम मोडला 

चार स्तरांमध्ये संसदेची सुरक्षा असते

  1. पहिला स्तर : दिल्ली पोलिस.
  2. दुसरा स्तर : पार्लियामेंट ड्युटी ग्रुप.
  3. तिसरा स्तर : संसदीय सुरक्षा सेवा
  4. चौथा स्तर : विविध सहयोगी सुरक्षा संस्था.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button