Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठ्ठल भक्तांना दिलासा! २४ तास घेता येणार विठुरायाचे दर्शन

Vitthal Mandir Pandharpur : कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ ला आहे. यानिमित्ताने राज्यातील लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. अशातच भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात २४ तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या गायनाच्या सुरेल मैफलीची सुश्राव्य पर्वणी 

मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास देवाचा पोशाख आणि शेजारतीनंतर  विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येणार आहे.

कार्तिकी यात्रा संपल्यानंतर १ डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button