‘..पण गिरीश महाजनांना नोहमी मोठी खाती मिळतात’; शिंदे गटातील नेत्याचं विधान

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे गट आणि भाजप आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचं मला काय देणं-घेणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन कारखाने आहेत. केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे.
हेही वाचा – नवरात्रीचा उपवास पहिल्यांदाच करत असाल तर ‘या’ नियमांची घ्या विशेष काळजी
विशेष म्हणजे व्यासपीठावर स्वत: गिरीश महाजन उपस्थितीत असताना गुलाबराव पाटील यांनी विनोदी शैलीत ही फटकेबाजी केली. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.





