Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘नक्षलवाद्यांच्या हस्ते शिंदेंचा एन्काऊंटर करण्याचा प्लॅन होता’; शिंदे गटातील नेत्याचा गंभीर आरोप

Share On

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खळबळदनक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.

हेही वाचा – ‘..त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार’; सुप्रिया सुळेंचा इशारा 

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी ‘मातोश्री’वरून (उद्धव ठाकरेंचं निवासस्थान) फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचं होतं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button