Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीबाबात शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबामध्ये सर्वात वडिलधारी व्यक्ती मीच आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही.

हेही वाचा – ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान नाही’; सीमा हैदरला मनसेचा इशारा

भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button