Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना मनसेचा पुन्हा अटीतटीचा इशारा!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना सुचना वजा धमकी दिली आहे. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसले तर खळ्ळखट्याक केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्मान चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमोल खोपकर यांनी दिला आहे.

अमोल खोपकर यांनी म्हटलं आहे की, लक्षात ठेवा, आम्ही नेहमीच पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांच्या विरोधात भूमिका घेत आहोत आणि करत राहू. जर कोणताही पाकिस्तानी अभिनेता भारतीय चित्रपट किंवा मालिकेत कोणचीही भूमिका साकारत असल्याचे आढळले तर आम्ही यांना निश्चितच फटकारतो. अशा कृतींसाठी अशा चित्रपटांचे किंवा मालिकांचे निर्माते जबाबदार असतील.

हेही वाचा – World Cup आधी भारतीय संघाला मोठा धक्का? ‘या’ खेळाडूची दुखापत गंभीर!

https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमेय खोपकर नेहमीच चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात. मराठी कलाकारांनाही ते सतत पाठिंबा देतात. त्यामुळे सिनेसृष्टीत मनसेचा चांगलाच दरारा आहे. त्यामुळे मनसेच्या इशाऱ्यावर आता सिनेसृष्टीतून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button