Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

रूपाली चाकणकर पुण्यातील ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून लढणार असल्याचं म्हटलं आहे. चाकणकर यांनी पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रूपाली चाकणकर म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केलं आहे. तसेच ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या, या गोष्टी तुमच्याकडून मला समजतात.

हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर का उभं केलं? चौकशीची मागणी

शरद पवार यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल पवार साहेबांची मी आभारी आहे. मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, अशी भूमिका रूपाली चाकणकर यांनी मांडली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button