Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; वधू-वर परिचय मेळाव्यात ठराव

Share On

सोलापूर : लग्न म्हटलं कि होऊ दे खर्च असचं चित्र सगळीकडं पहायला मिळतं. अनेक जन प्री-वेडिंग फोटोशूटकडे वळत आहेत. ज्यात लग्नापूर्वी काही फोटो काढले जातात. मात्र आता प्री-वेडिंगवर मराठा समाजाने बंदी घातली आहे. मराठा सेवा संघ आयोजित सोलापुरातील मराठा वधू-वर परिचय मेळावा घेतला. मेळाव्याला जवळपास ५०० वधू-वरांना हजेरी लावली होती. त्यात हा ठराव करण्यात आला. जो एक मताने मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा – राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा! हवामान खात्याने वर्तवला अंदाज

मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठी वधू वर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून दिले आहे, त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री-वेडिंग शूटिंग ला पायबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button