पिंपरी-चिंचवड हादरले! तळेगाव नगर परिषदेसमोर दिवसाढवळ्या गोळीबार, किशोर आवारे यांचा खून

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळीबार करत हत्या झाल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. ते दुपारी दोनच्या सुमारास नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्याला भेटून बाहेर पडताच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर त्यांना सोमाटणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हललेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.
हेही वाचा – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ‘ही’ महिला देणार आव्हान
आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आवारे या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




