‘रोहित शर्माने ब्रेक घेतला पाहिजे’; सुनिल गावस्कर

IPL 2023 : आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लढत झाली. या सामन्यात मुंबईला ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा एकदा रोहित शर्मा दबावाखाली कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, रोहित शर्माने विश्रांती घ्यावी, असं माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, मला मुंबईच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल पाहायला आवडेल. मी असेही म्हणेन की रोहितने कदाचित काही काळ विश्रांती घ्यावी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवावे. रोहित शेवटच्या काही सामन्यांसाठी पुन्हा पुनरागमन करू शकतो, परंतु सध्या, त्याने स्वत: थोडा मोकळा श्वास घेतला पाहिजे.
रोहित थोडासा व्यग्र दिसत आहे. कदाचित या टप्प्यावर तो WTC बद्दल विचार करत असेल, मला माहित नाही. पण मला विश्वास आहे की या टप्प्यावर त्याला थोडा ब्रेक हवा आहे आणि शेवटच्या तीन किंवा चार सामन्यांसाठी तो पुनरागमन करेल जेणेकरून तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अतिम समान्यासाठी तयार असेल, असंही सुनील गावस्कर म्हणाले.





