‘रॅप सॉग्सच्या माध्यमातून व्यवस्थेवर टीका करणाऱ्यांच्या राष्ट्रवादी सर्वशक्तीनिशी पाठीशी’; जयंत पाटील

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळी तरुण मुले व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका करणारी रॅप सॉंग्स तयार करत असून या तरुण मुलांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांच्या कडून सुरु आहेत. या सर्व तरुणांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी उभा आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो. म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत, असे खडेबोल जयंत पाटील यांनी सरकारला सुनावले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर एका तरूणांना अश्लील शब्द असलेलं रॅप गाणं गायले. या रॅप गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. शुभम जाधव असं या तरूण रॅपरचं नाव आहे. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं आहे. या तरूणाची आता चौकशी केली गेली.





