Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

पॅन-आधार जोडणीला ३० जून पर्यंत मुदतवाढ

पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली

Pan Aadhaar Link : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDT अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

CBDT ने मंगळवारी पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटचा तारीख ३१ मार्च २०२३ होती. पण आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवण्यात आलेली आहे. आता पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button