Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

Oscar 2023 : भारताची ऐतिहासिक कामगिरी; दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार

Oscar 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

यंदा भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉकिमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आर आर आर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या विभागात ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button