Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित लढवणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा, पिंपरी चिंचवड निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच पक्षांनी सूरू केली आहे. याचसंदर्भात काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देयची आहे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहिती राऊतांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button