सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार? ट्वीटनंतर चर्चांना उधाण

सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार? ट्वीटनंतर चर्चांना उधाण

सत्यजीत ताबेंचा नेमका कुणाला इशारा..

नाशिक : काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केलं आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. यासंबंधित आज सत्यजीत तांबे यांनी केलेल्या ट्वीट सध्या चर्चेत आहे.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, असं ट्वीट आमदार सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज लावला जात आहे.

https://twitter.com/satyajeettambe/status/1625366536411303936?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1625366536411303936%7Ctwgr%5E4ab8439913220f585982c7b5d0e671239aaa84c3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fwill-satyajit-tambe-join-bjp-rumours-after-latest-tweet-rmm-97-3462871%2F

दरम्यान, आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे अपक्षच राहणार. तसेच मी अजून काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *