बारामतीच्या रोहित शिंदेची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

चालू मोटारसायकलवर 4 मिनिटे 20 सेकंदामध्ये घातले 10 सुर्यनमस्कार
पुणे : १४ जानेवारी जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त बारामतीतील तरुणाने चालू मोटारसायकलवर 4 मिनिटे 20 सेकंदामध्ये 10 सुर्यनमस्कार घातले. रोहित शिंदे असं सूर्य नमस्कार घतलेल्या या तरुणाचे नाव आहे. रोहितची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मोटार सायकलवर 10 वेळा सुर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला मोटार सायकल रायडर बनला आहे.
रोहित वयाच्या 16 वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आहे. गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शो भारतात केले आहे. मोटार सायकल रायडींग करणे हा स्वत: पुरता मर्यादीत राहिलेला नसून त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले आहे. मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे.
मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकीक केलेला आहे. त्यामध्ये देशातील ७० रायडरने भाग घेतला होता. केटीएम कंपनीच्या आरसी ३९० सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणाऱ्या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी राहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणाऱ्यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेणार आहे, असं बजाज ऍटो लि. चे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.





