Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
‘आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा’; शिंदे गटातील नेत्याची टिका

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवून दाखवण्याचे चॅलेंज दिले होते. ते चॅलेंज शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्विकारलं आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज नाही आम्हीच तुम्हाला हरवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजीनामा देण्याचीच जर चर्चा सुरु आहे तर महाज्ञानी आणि स्वाभिमानी राऊतांनी आमदारांच्या (राऊतांच्या भाषेत- रेडा, दगड, गिधाड इ.) जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा!!! आणि जमलंच तर परत खासदार होऊन दाखवावे!!! आहे हिंमत?, अशी टिका शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.




