कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर

पुणे : राज्यातील विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांनंतर आता सर्व राजकीय पक्षांनी आपला मोर्चा पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे वळवला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणुक लढवण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसने कसबा मतदारसंघातुन आपला उमेदवार जाहीर केला आहे.
याबाबत, काही वेळापुर्वी नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.





