आश्विनी जगताप आणि शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर सुरू

आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत नाट्यमय घडमोडी सध्या सुरू आहेत. काल दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्यानंतर दोन्ही समर्थकांनी आपापल्या उमेदवारांचे फोटो व्हायरल करून प्रचार करत आहेत.
आश्विनी जगताप यांच्या समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर आणि व्हॉट्सअॅप स्टोटसवर “आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा”, अशा आशयाचे फोटो व्हायरल केले जात आहेत. तर शंकर जगताप यांच्या समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर “एक ही कार्यकर्ता ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडणार नाही. आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच, अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत.
सोशल मीडियावर जगताप समर्थकांकडून हे वॉर सुरू झाल्याने जगताप कुटुंबातील वादाला तोंड फुटणार का? याकडे लक्ष लागले आहे.





