Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Indrayani Thadi-2023 : ‘इंद्रायणी थडी 2023’ महोत्सवात भरणार भव्य रोजगार मेळावा

Share On

तब्बल ३ हजार ३५१ इतक्या पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित

भोसरी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर दि. २५ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवासाठी तब्बल १७ एकर जागेत संपूर्ण महाराष्ट्रातील १ हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवात तरुणांना रोजगाराची संधी मिळवी या अनुषंगाने रोजगार मेळावासुद्धा आयोजित केला आहे. त्यासाठी महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि विविध संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. 25 जानेवारी रोजी हा रोजगार मेळावा पार पडणार आहे.

यावेळी खासगी आस्थापनेतील तब्बल ३ हजार ३५१ इतक्या पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी २३ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचे स्टॉल याठिकाणी उपलब्ध केले आहेत. इयत्ता १० वी ते पदवीधर तसेच आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या सर्व उमेदवारांनी रोजगार मेळ्याव्यास येताना शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व बायोडाटा या सर्व प्रती सोबत घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अधिक माहितीसाठी 9689866804/ 7972965226 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button