पवार कुटुंबीय इतिहास विसरले, संभाजी राजे धर्मवीरच!

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांची टीका
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध
पिंपरी । प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माभिमानासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हा इतिहास पवार कुटुंबीय विसरले आहेत. महापुरूषांचा अपमान हेच पवारांचे अभियान आहे, अशी टीका भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वादग्रस्त विधान केले. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी येथील भेळ चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी, प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अजित कुलथे, प्रदेश युवती सहसंयोजिका वैशाली खाडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश यादव,दीपक नागरगोजे, जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, पंकज शर्मा, सतीश नागरगोजे, प्रशांत बाराथे, युवराज ढोरे, राहुल खाडे, निलेश अष्टेकर, मंगेश घाडगे, मंडल अध्यक्ष सुमित घाटे, सनी बारणे, सागर घोरपडे, केतन पाटील, विद्यार्थी संयोजक दिगंबर गुजर, सहसंयोजक अजय मोरे, साहिल कांबळे, कल्पेश साळवी, सोशल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, संयोजक प्रथमेश सकपाळ, वरद जोशी आदी उपस्थित होते.
धर्मासाठी झिजला छावा औरंग्याचा जाणून कावा, महापुरूषांचा अपमान हेच पवारांचे अभियान, अश्या घोषणा देत अजित पवार यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यात आला.





