Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशात आता नागरिकांना कुठूनही करता येणार मतदान…?

निवडणूक आयोगाने बनवले रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन

नोकरी किंवा कामानिमित्त अनेक जण आपले गाव, शहर सोडून दूर राहतात. निवडणुकींच्या वेळी हऱ्याचजा या परदेशात असणाऱ्या नागरिकांना आपला बहुमुल्य मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. अशा लोकांच्यसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा व महत्वाचा निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे.

भारतातील नागरिक कोणत्याही देशात उद्योग किंवा कामासाठी असला तरी आपला मतदानाचा हक्क त्याला बजावता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने आरव्हीएम मशिन म्हणजेच रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन तयार केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या 16 जानेवारीला या मशीनच्या डेमोसाठी राजकीय पक्षांना बोलावले आहे. यावेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ञ समितीही उपस्थित असेल. या व्यतिरिक्त विविध मुद्द्यांवर आयोगाने 31 जानेवारीपर्यत लेखी मते मागवली आहेत.

सोबतच, 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशात 67.4 टक्के मतदान झाले होते, यावेळी तब्बल 30 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘आरव्हीएम’ फायदेशीर ठरणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button