Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारेंना भोवणार?

  • आधी वारकरी आता महानुभाव पंथाचा संताप

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

आपल्या फटकेबाज भाषणांमुळे सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आता अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भाषणांदरम्यान केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारकरी संप्रादयाने त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता महानुभाव पंथानेही सुषमा अंधारेंचा कडाडून विरोध केला आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या पक्षाला मतदान न करण्याचा इशारा महानुभाव पंथाने दिला आहे.

सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी हिंदूच्या देव देवातांविरोधात अपमानजनक वक्तव्ये केल्याचा दावा वारकरी आणि महानुभाव पंथाकडून करण्यात येतोय. सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याची भूमिका दोन्ही पंथीयांनी घेतली आहे.

महानुभव पंथाने घेतली शपथ
औरंगाबादेतील महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी श्रीकृष्णाला साक्षई मानत सामूहिक प्रतिज्ञा केली. आम्ही सर्व महानुभाव पंथाचे साधक आज शपथ घेतो की.., श्रीमती सुषमा अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल, भगवान श्रीकृष्ण चक्रवतींबद्दल जे अपशब्द वापरले आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. ज्या पक्षामध्ये सुषमाताई अंधारे राहतील, त्या पक्षाला आम्ही महानुभाव पंथाचे साधक कधीही मतदान करणार नाहीत. अशी शपथ आज आम्ही भगवान कृष्णांना साक्षी ठेवून घेत आहोत.

सुषमा अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल जे बेताल वक्तव्य केले आहेत. त्याचा आम्ही सर्व महानुभाव पंथाचे साधक म्हणून जाहीर निषेध करत आहेत. अंधारे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्या ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. आमच्या ईश्वराविषयी एखाद्या महिलेने बोलावे हे हिंदू धर्मासाठी खूप खेदाची गोष्ट आहे. श्रीकृष्ण भगवान यांच्या नखाची देखील अंधारे बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे विधान करणाऱ्या अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला आम्ही मानणार नाही, असं महानुभाव पंथाचे साधक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group