शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं थेट आव्हान, हिंमत असल्यास समोर या…

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं थेट आव्हान, हिंमत असल्यास समोर या…

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील. मात्र, ही झुंडशाही अजिबात खपवून घेतली जाणार नाही. शब्दाला शब्दानेही टक्कर देता येते. काल संध्याकाळी आणि आजही मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, माझा असा म्हणण्याचा हेतू नव्हता. एका गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं हे संरजामशाहींना झेपत नाहीये. त्यामुळे हे भ्याड हल्ले सुरू आहेत. उद्यापासून कोणतंही पोलीस संरक्षण माझ्यासोबत नसेल. त्यामुळे हिंमत असल्यास समोर या, असं थेट आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

चंद्रकात पाटील यांच्यावर झालेल्या शाईफक हल्लयानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे, तसेच मी कोणाला घाबरत नाही. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अशा प्रकारचा भ्याड हल्ला होणं हे दुर्दैव आहे. हिंमत असेल तर समोर या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जपलं, त्यामध्ये प्रत्येकाने आपलं मत मांडावं. त्याला विरोध लोकशाही मार्गाने करायचा. परंतु ही महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *