Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मालाडमधील 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग; बाल्कनीतून उडी मारत तरुणीने वाचावला जीव

Share On

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबईतील मालाडमधील जनकल्याण नगरमधील एका 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून वरच्या मजल्यावरही ज्वाळा दिसत होत्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झाली नाही. या आगीच्या घटनेचा एत व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी बाल्कनीतून खाली उडी मारून आपला जीव वाचवताना दिसत आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्या इमारतीमध्ये आग लागली ती इमारत मालाडमधील जनकल्याण नगरमधील आहे, आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या 21 मजली इमारतीतील बहुतांश फ्लॅटमध्ये कुटुंबं राहतात. आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून या फ्लॅटमधील लोक देखील घाबरले. दुसऱ्या मजल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरही आग पोहोचली, मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ज्या फ्लॅटमध्ये ही आग लागली तेथील रहिवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button