TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, तर उत्तर भारतात बर्फवृष्टी

Share On

नवी दिल्ली ।

पश्चिमेकडे वातावरणात बदल झाले आहेत आन त्याचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर होत आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू आणि लगतच्या राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने चेन्नईसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 1 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या मते, चेन्नईमध्ये आज साडेतीन इंच पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मागील 72 वर्षात तिसऱ्यांदा एवढा पाऊस पडला आहे.

IMD च्या अतिवृष्टीचा इशारा पाहता नागापट्टिनम, मायिलादुथुराई आणि तिरुवरूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आले. चेन्नई हवामान खात्यानुसार, आज मुसळधार पावसासह ढगाळ वातावरण होते. चेन्नईच्या अनेक भागात आज मुसळधार पाऊस झाला.

खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्री चक्रीवादळाची परिस्थिती कायम आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button