TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहून घरफोडय़ा

Share On

पुणे : दिवाळीत चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी गेल्यावर काही जण समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असून, ते पाहून बंद असलेल्या सदनिका फोडून ऐवज चोरण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करताना खबरदारी घ्यावी, परगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिवाळीत अनेक जण मूळगावी; तसेच पर्यटनासाठी जातात. बाहेरगावी गेल्यानंतर काही जण समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करतात. चोरटे समाजमाध्यमातील छायाचित्रे पाहून बंद असलेल्या सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लांबवितात. त्यामुळे परगावी जाताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button