TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवाजी महाराज केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी आदर्श आहेत; ज्योतिरादित्य शिंदे यांची भावना

पुणे : भारताला स्वदेशी, हिंदूवी स्वराज्याची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली. त्यांचे शौर्य, बुद्धिमत्ता, सैन्याचा अनुभव, नौदलाबाबतचा दृष्टिकोन अद्भुत होता. सर्व समुदायातील माणसांना एकत्रित ठेवणारे नेतृत्व असलेले शिवाजी महाराज केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी आदर्श आहेत, अशी भावना नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली.

पुणे दौऱ्यामध्ये शिंदे यांनी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव येथे साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला भेट दिली. त्या वेळी शिंदे बोलत होते. शिवसृष्टी प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. शिंदे म्हणाले,की मराठा साम्राज्याला एक स्वर्णिम इतिहास आहे. ‘देश’ या विचारधारेची सुरुवात मराठा साम्राज्याचा काळात झाली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button