Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमी

‘नवा गडी, नवं राज्य’ ः नितीश कुमार उद्या पुन्हा घेणार CM पदाची शपथ

पाटणा । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

जनात दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडत असल्याचं आज स्पष्ट केलं. त्यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. तोच आता ते उद्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीत नव्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्या सायंकाळी २ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश यांनी भाजपची साथ सोडली असून त्यांनी आपला भिडू म्हणून राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेतलं आहे. उद्या आठव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

बिहारमधील महागठबंधनाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि बिहारमध्ये सरकार स्थापन केण्यास हातभार लावल्याबद्दल नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागु चौहान यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. तसेच नितीश यांना राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून पुढे शपथविधी होऊपर्यंत काम पाहण्याची विनंती राज्यपाल चौहान यांनी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button