The incident of a young man being carried away in the river Ulhas in Neral
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला आला पूर.
मासेमारीसाठी गेलेला तरुण गेला वाहून.
वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू.
नेरळ: उल्हास नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना नेरळमध्ये घडली आहे. हा तरुण मासेमारी करण्यासाठी नदीत उतरला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने हा तरुण वाहून जाऊ लागला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या काही जणांनी प्रयत्न केला. मात्र हा तरुण किनाऱ्यापासून लांब असल्यानं त्याला वाचवता आले नाही.या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्न सुरू असतानाच तो बदलापूरच्या दिशेनं वाहून गेला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आला आहे. हा तरुण नेमका कोण होता, हे मात्र अजूनही समजू शकलेलं नसून.