महाराष्ट्र कामगार कल्याण भवनात काम करणा-या कर्मचा-यास मारहाण

महाराष्ट्र कामगार कल्याण भवनात काम करणा-या कर्मचा-यास मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

संभाजीनगर चिंचवड येथील महाराष्ट्र कामगार कल्याण भवन या कार्यालयात काम करणा-या एका कर्मचा-याला एका व्यक्तीने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ११) दुपारी चार वाजता घडली.

इरफान शकुर खान (वय ४२, रा. सॅलसबरी पार्क, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परवेझ हनीफ खान (वय ४०, रा. घोरपडे पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात जागेच्या कारणावरून वाद आहेत. फिर्यादी हे महाराष्ट्र कामगार कल्याण भवन येथे नोकरी करतात. ते बुधवारी कामावर हजर असताना आरोपीने फिर्यादी यांच्या कार्यालयात येऊन त्यांना शिवीगाळ व धमकी दिली. त्यांना कार्यालयाच्या बाहेर येण्यास भाग पाडून अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली. फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *