पिंपरी / चिंचवड

गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का, असे म्हणत दोघांना मारहाण; एकावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी
‘तू भीमनगरमध्ये गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का, असे म्हणून दोघांना मारहाण करण्यात आली. तसेच एकाच्या डोक्यात वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री सव्वा अकरा वाजता भीमनगर, चिंचवड येथे घडली.

ओमकार उर्फ आनंद ओव्हाळ (वय 24, रा. भीमनगर, चिंचवड) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत रवींद्र रामदास लोंढे (वय 29, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचा मित्र धीरज धिनेश लिंगवत (रा. मोदीखाना कॅम्प, पुणे) हे दोघेजण भीमनगर चिंचवड येथील एका बारमधून पाण्याची बाटली घेऊन घरी जात होते. त्यावेळी त्यांचा मित्र आरोपी हेमंत तिथे आला. त्याने फिर्यादी यांना आवाज देऊन त्याच्याकडे बोलावले. फिर्यादी गेले असता, ‘तू भीमनगरमध्ये गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का, असे म्हणून शिवीगाळ करत ‘तू इथेच थांब तुला दाखवतो’ असे म्हणून तिथून निघून गेला.

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा मित्र घरी जात होते. आरोपी पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांना उलट्या कोयत्याने मारले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र धीरज हा आला असता त्याच्या डोक्यात कोयत्याने मारून आरोपीने जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group