Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा पिंपरी-चिंचवडमध्ये गौरव

पिंपरी: सातारा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब विजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांचा पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.11) विशेष सत्कार करण्यात आला. त्याला सुमित स्पोर्ट्स प्रा. लि.च्या वतीने 50 हजार रूपये व स्पोर्ट्स किट भेट देण्यात आले.

स्पर्धा शनिवारी (दि.9) झाली. त्यात 20 वर्षीय पृथ्वीराज पाटीलने सोलापूरच्या विशाल बनकरचा पराभव केला. महाराष्ट्र केसरी पाटील आज शहरात आला होता. भोसरी एमआयडीसीतील सुमीत स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. अर्जुनपुरस्कार पैलवान व प्रशिक्षक काका पवार, हिंदकेसरी योगेश दोडके, राज्य कुस्ती मार्गदर्शक शिवाजी कोळी, भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सुमित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक साजीद शेख, संचालक मोहसीन बागवान, इम्रान बागवान, रशीद खान, अल्लाउद्दीन जहाँगिरदार आदी या वेळी उपस्थित होते.
संचालक मोहसीन बागवान म्हणाले की, सुमित स्पोर्ट्सच्या वतीने खेळांना विशेषत: कुस्तीला पूर्वीपासून पाठींबा व प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मॅट आम्हीच पुरविली होती. मागील महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर तसेच, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू वेताळ शेळके यांचाही कंपनीने विशेष गौरव केला होता.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button