पिंपरी / चिंचवड

फ्लॅट विकण्यासाठी महिलेला दमदाटी

Share On

पिंपरी l प्रतिनिधी

फ्लॅट विकण्यासाठी महिलेला दोघांनी दमदाटी केली. आरोपींना फ्लॅट न विकल्यास महिला आणि तिच्या पतीवर वारंवार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना 13 जानेवारी 2020 रोजी सुदर्शन नगर चिंचवड येथे घडली.

अखिल अशोक परब प्रणाली अखिल परब (दोघे रा. सुदर्शन नगर चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या मालकीच्या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रीतम पाटील ह्या व्यक्तीला आणले होते. प्रीतम पाटील कडून फ्लॅटच्या व सागर अपार्टमेंटच्या बाजूच्या बोळीतील परिसर स्वच्छ करून घेत असताना आरोपी अखिल तिथे आला. लोखंडी रॉड घेऊन अखिल फिर्यादी यांच्या अंगावर आला. तू मला तुझा फ्लॅट साडेसतरा लाख रूपयांना विकुन येथून निघून जा. फ्लॅट नाही विकला तर मी तुझ्या नवऱ्याचे व तुझे हात पाय मोडेल. तुम्हाला येते राहू देणार नाही. तसेच तुमच्या भाडेकरूंना पण राहू देणार नाही, अशी धमकी दिली. आरोपी प्रणाली तिने तुला आम्ही साडेसतरा लाख रुपये देतो तू तुझा फ्लॅट आम्हाला विकुन निघून जा. नाहीतर आम्ही तुला तुझ्या जागेत पाय ठेवू देणार नाही. तसेच तू आम्हाला तुझा फ्लॅट विकला नाही तर आम्ही तुझ्यावर तुझ्या नवऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात वारंवार गुन्हे दाखल करून त्रास देऊ, अशी धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button