पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 7 मार्चपासून

पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 7 मार्चपासून

पिंपरी चिंचवड | पूना क्लबच्या वतीने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथे दिनांक 7 ते 12 मार्च दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष आहे.स्पर्धेत क्लबमधील 12 ते 55 वयोगटातील सदस्य सहभागी होणार आहे. या खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. अर्जून मोटाडू या खेळाडूला लिलावात सर्वाधिक बोली लागली. त्याला टायगर्स संघाने 7 हजार 800 रुपये बोली लावून संघात घेतले.

शशांक हळबे म्हणाले, प्रत्येक संघात 12 ते 14 खेळाडू असणार आहेत. यातील 9 खेळाडू मैदानात असतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरुपात होणार आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा असणार आहे. स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटांतून चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील आणि त्यानंतर अंतिम सामना 12 मार्चला खेळला जाणार आहे.

जेट सिंथेसिस, देसाई ब्रदर्स, फिनलॅंड इंटरनॅशनल स्कूल हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक तर ब्रिहन नॅचरल प्रडक्टस हे सहयोगी प्रायोजक आहेत. अशी माहिती हळबे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *