अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरणाला फुटली वाचा
पिंपरी l प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील माण येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी गरोदर राहिली. चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. हा प्रकार 11 नोव्हेंबर 2021 नंतर दोन दिवसांनी वेळोवेळी घडला आहे.
पीडित 16 वर्षीय मुलीच्या 41 वर्षीय वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वाढदिवसाला आरोपी तरुण चॉकलेट घेऊन आला. त्यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आई, वडील, भाऊ कामानिमित्त बाहेर गेले असता आरोपीने पीडितेच्या घरी येऊन मुलीला आणि तिच्या लहान भावाला चॉकलेट खायला दिले. चॉकलेट खाल्ल्यावर पीडित मुलगी झोपी गेली. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.





