पिंपरी / चिंचवड

‘तू मेला तरी चालेल मी तुझ्या डोक्यातच फरशी घालतो’ म्हणत डोक्यात घातली फरशी

हिंजवडी येथील घटना

पिंपरी l प्रतिनिधी

‘तू मेला तरी चालेल मी तुझ्या डोक्यातच फरशी घालतो’ असे म्हणत एकाने एका व्यक्तीच्या डोक्यात फारशी घातली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.

जगन्नाथ पंडितराव ढगे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक झोडपे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा भाऊ गणेश ढगे (वय 33) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ जखमी गणेश हे 21 फेब्रुवारी रोजी रात्री घरी आले नाहीत म्हणून फिर्यादी त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी गणेश आणि आरोपी दीपक यांचे भांडण सुरु असल्याचे फिर्यादी यांना दिसले. फिर्यादी यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने गणेश यांना  ‘तू मेला तरी चालेल मी तुझ्या डोक्यातच फरशी घालतो’ असे म्हणून फारशी डोक्यात घातली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button