मोबाईल, स्मार्ट वॉच, पॉवर बँकसह तीन लाखांचे साहित्य चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
रुपीनगर तळवडे येथील सक्षम एंटरप्रायजेस हे दुकान अज्ञातांनी फोडले. दुकानातून 52 मोबाईल फोन, टॅब, स्मार्ट वॉच, एअर बड्स, ब्ल्यूटुथ, कॅमेरे, पॉवर बँक, स्मार्ट वॉच एअर बड्स वायरलेस ब्ल्यूटुथ संच असा एकूण तीन लाख 14 हजार 669 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री साडेदहा ते मंगळवारी (दि. 15) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.
हनुमंत कल्याण ढेरे (वय 32, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर टाळावे येथे सोनिग्रा हाईटस मध्ये शॉप नंबर नऊ येथे फिर्यादी यांचे सक्षम एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे व किमतीचे 52 मोबाईल फोन, दोन टॅब, 10 स्मार्ट वॉच, 25 एअरबड्स, 79 स्मार्ट वॉच एअर बड्स वायरलेस ब्ल्यूटुथ संच, पाच ब्ल्यूटुथ, दोन कॅमेरे, 20 पॉवर बँक असा एकूण तीन लाख 14 हजार 669 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.




