पिंपरी / चिंचवड

शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन ठिकाणी कारवाई : तडीपार गुंडासह दोघांना अटक

पिंपरी | प्रतिनिधी

शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला अटक केली आहे. तसेच दुसऱ्या एका कारवाईमध्ये एका तरुणाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाया शनिवारी (दि. 5) सायंकाळी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आल्या.

अजय अश्रुबा दुनघन (वय 25, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), विष्णू दगडू रोकडे (वय 26, रा. मोहननगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी अजय याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारी 2021 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी त्याने शासनाची अथवा पोलिसांची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलीस अजय याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. पोलिसांनी अजय याला अटक केली आहे.

पोलिसांनी दुसऱ्या कारवाईमध्ये विष्णू रोकडे याला अटक केली. त्याच्याकडून दीडशे रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button