Uncategorized

वाहनाखाली श्वानाचा मृत्यू झाल्याने वाहन चालकालास मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

एका वाहनाच्या खाली आल्याने श्वानाचा मृत्यू झाला. यावरून तिघांनी मिळून वाहन चालकास बेदम मारहाण केली. ही घटना 22 जानेवारी रोजी दुपारी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

महादेव देविदास कुंभार (वय 38, रा. सांगुर्डी फाटा, येलवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 30) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासर्जेराव भोसले, योगेश भोसले, सौरभ भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहन चालक आहेत. त्यांच्या वाहनाखाली आरोपींचा पाळीव श्वान आला. त्यात श्वानाचा मृत्यू झाला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना एमआयडीसी भोसरी मधील वैभव स्टीलच्या बाजूला बोलावून घेतले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कंपनीत पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या पाठीत,  पायावर,हातावर, बरगडीवर मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक एन बी चापाले तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group